आजपासून 5 दिवस बँका बंद
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे आजपासून 5 दिवस बँका बंद राहणार आहे. या संपामुळे 21 ते 26 डिसेंबरच्या काळात बँका बंद ठेवण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात असून, बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दाही या संपाच्या केंद्रस्थानी असणार आहे. 21 डिसेंबरला शुक्रवार असून, त्याच दिवसांपासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे.
22 आणि 23 डिसेंबरला शनिवार, रविवार असल्यानं बँकांना सुट्टीच राहणार आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी असल्यानं बँका बंद राहणार आहेत. तर 26 डिसेंबरपासून युनायटेड फोरमने पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours