पंढरपूर : राम मंदिरासाठी अयोध्या दौरा करून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. 24 डिसेंबरला पंढरपूर इथं उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे अशी माहिती सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
रामदास कदम पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कदम यांनी नमामी चंद्रभागा प्रकल्पाचाही घेतला आढावा घेतला. येत्या सोमवारी 24 डिसेंबरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभ होणार आहे. याच दिवशी सायंकाळी चंद्रभागा नदीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. राम मंदिर आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन केल्याचं ते म्हणाले. 
उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दुपारी ४ वाजता तर चंद्रभागा नदीची आरती येथील इस्कॉन मंदिराच्या घाटावरून सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours