मुंबई: हिरे व्यापारी राजेश्वर उदाणी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी सचिन पवार याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सचिन पवारला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
ज्या दिवशी राजेश्वर उदाणी यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांच्या मोबाईलचं लोकेशन ज्याठिकाणी होतं त्याच दिशेनं सचिनच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस झालं होतं. 
याशिवाय सचिनला उदाणी यांच्याकडून काही पैसे येणे बाकी होते. यासाठी सचिन वारंवार त्यांना मॅसेज करत होता. उदाणी यांचे अपहरण झाल्याची तक्रार स्वत: सचिननेच पोलीस स्थानकात दाखल केली होती. 
या घटनेदरम्यान सचिनने नंबर प्लेट बदलवून कार वापरल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
काय आहे प्रकरण?
घाटकोपरचे हिरे व्यावसायिक राजेश्वर उदानी 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. त्यानंतर थेट त्यांचा मृतदेहच पनवेलजवळच्या जंगलात सापडला. उदानी ज्यादिवशी बेपत्ता झाले. त्याच दिवशी त्यांच्या मोबाईलवर एकाच व्यक्तीचे तब्बल 13 कॉल होते आणि ती व्यक्ती होती सचिन पवार...सचिनला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत डेवोलिना भट्टाचार्य या आघाडीच्या टीव्ही अभिनेत्रीलाही ताब्यात घेण्यात आल्यानं हत्येला वेगळं वळण लागलं होतं. तिची चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, सचिन पवार हा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव आहे. सध्या तो प्रकाश मेहता यांच्यासोबत काम करत नाही. पण तो घाटकोपरमध्ये भाजपमध्ये सक्रिय होता. सचिन पवारच्या पत्नीला भाजपनं महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours