पुणे: देशाला आघाडी शिवाय पर्याय नाही. आम्ही समविचारी विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षाचं स्थान महत्वाचं आहे. त्या राज्यात त्या पक्षाला महत्त्व द्या असा नवीन प्रस्ताव केंद्रासमोर ठेवला आहे त्याला पाठिंबा मिळत आहे अशी माहितीही पवारांनी दिली.
पुण्यात आज राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शरद पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीकाही केली.
जातीजातीत अंतर वाढवलं जातंय. राजस्थानमध्ये राजपूत आणि जाट यांच्यात अंतर आहे, महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी यांच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला अशी टीका पवारांनी केली.
राज्यात पन्नास टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची मागणी आम्ही केली होती. फडणवीस सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देत दिवाळी साजरी करा असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं.पण आंध्र प्रदेशात भाजप अध्यक्ष अमित शहाच 50 टक्क्यांवर आरक्षण टिकणार नाही अस सांगत आहे असा मुद्दाही पवारांनी उपस्थितीत केला.
महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती भीषण आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी आधार द्यायला हवं आहे.
आम्ही सत्तेत असताना दुष्काळाचं चित्र लक्षात येताच वारंवार त्या भागात जाऊन तिथल्या लोकांना संकटातून बाहेर काढण्याचं काम केलं. परंतु, या सरकारचा दृष्टिकोन मात्र आस्थेचा नाही अशी टीकाही पवारांनी केली.
सरकार म्हणून उत्तर दिलं जात नाही. मागील साडेचार वर्षात पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही
कोणत्या योजना याबद्दल देशवासीयांना सांगितलं नाही अशी टीकाही पवारांनी मोदींवर केली.
राफेल विमान खरेदी आघाडीच्या काळात 450 कोटी होती. ती किंमत 1600 कोटींपर्यंत कशी गेली, काही प्रश्न असेल तर जबाबदारी अरुण जेटली यांच्यावर टाकली. पी चिदंबरम यांनी लेख लिहून हा व्यवहार कसा चुकीचा आहे हे सांगितलं. त्या लेखाला उत्तर
रामभाऊ म्हाळगी येथील पदाधिकारी वर्तमानपत्रात लेख लिहून उत्तर देतात. यावरून बाहेरच्या संस्थांची मदत घेतली जाते हे लक्षात येतं असंही पवार म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours