जिल्हा शमीम अकबानी
भंडारा,दि. 10 :- माहितीचा अधिकार कायद्याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, शासन कारभारात व उत्तरदायित्वाची प्रक्रीया वाढीस लागावी यासाठी भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभाग, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, मुंबई पुरस्कृत अनुभव लेखन व निबंध लेखन स्पर्धा 2018-19  यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी( यशदा ), पूणे मार्फत घेण्यात येत आहे. भंडारा जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांनी अनुभव लेखन व निबंध लेखन स्पर्धेत सहभागी होवून आपली प्रवेशिका 15 डिसेंबर 2018 पर्यंत आपली प्रवेशिका सादर करावी. 
अनुभव लेखन व निबंध लेखन स्पर्धा विषय या प्रमाणे आहेत. माहिती  अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्वये स्वयंप्रकटीकरणाची सद्यस्थिती, अर्ज निकाली प्रक्रीया व प्रथम अपिल सुनावणी, राज्य माहिती आयोगाचे निर्णय व निर्णयांची अंमलबजावणी, महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2005 अंमलबजावणी असे अनुभव लेखन स्पर्धेचे विषय आहेत. 
वैयक्तिक माहितीची गोपनियता आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005, आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार अधिनियमांवरील न्यायनिवाडे, माहितीचा अधिकार कायद्यातील कलम 4 ची भूमिका असे निबंध स्पर्धेचे विषय आहेत. 
अनुभव लेखन आणि निबंध लेखन सुवाच्च अक्षरात 1000 शब्दांपर्यंत हस्तलिखीत अथवा टंकलिखीत केलेले स्विकारले जातील. अनुभव लेखनासोबत आवश्यक ते पुरावे जोडणे अनिवार्य आहे. अनुभव लेखन व निबंध लेखन करीता प्रथम क्रमांक 3 हजार 500 रुपये, द्वितीय 2 हजार 500 रुपये व तृतीय पुरस्कार 1 हजार 500रुपये असून पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. 
भंडारा जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीकांनी अनुभव लेखन व निबंध लेखन स्पर्धेत सहभागी होवून आपली प्रवेशिका 15 डिसेंबर 2018 पर्यंत पोष्टाने, कुरीअरने संचालक, माहिती अधिकारी केंद्र राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे- 411007 यांचेकडे सादर करावे. प्रवेशिका नमुना करीता किंवा स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिवाजी स्टेडियम, भंडारा येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.॥
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours