रिपोर्टर.. परदेशी
सद्ध्या ची सरकार ही जनतेची सरकार नसुन ही सरकार कॉम्प्युटर आणि उद्योग पतींची सरकार आहे. कारण यांच्या प्रत्येक गोष्टीत आॅनलाईन, वेबसाईट,स्मार्ट सीटी, आणि उद्योग याच गोष्टीचा गाजावाजा जास्त दिसत आहे. यांच्या जाहीर नाम्याचा विचार केल्यास फक्त शेतकरी व शेतकरी आत्महत्या, स्वामी नाथन आयोग, वेगळा विदर्भ या गोष्टी केंद्र बिंदू होत्या परंतु पहाता पहाता हे सरकार केव्हा आॅनलाईन झाले हा विचार करण्याची गरज आहे. गेल्या चार वर्षांत यांना राम आठवला नाही किंवा हनुमान आठवला नाही परंतु आता निवडणुक जवळ येताच यांनी मंदिर वही बनायंगे व भगवंताचे कास्ट सर्टीफिकेट काढण्याचे काम यांनी सुरू केले आहे, निवडणूक जिंकण्यासाठी अनेक खोट्या आश्वासने देऊन टाकली आणि आता जनता यांची कान उघडणी करित आहे तेव्हा सांगतात की ते सर्व जुमले होते. म्हणुन माझी सर्व शेतकरी बंधु - भगीनी यांना एकच सांगणे राहील की, आता तुमचा नाना राष्ट्रीय नेता झाला त्यामुळे आपण आत्महत्या करु नका काही दिवस संयम ठेवा कारण या सरकारचे दिवस आता भोगले आहेत आणि त्याच्या नांदीला राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड येथुन सुरुवात झाली आहे असेही ते मौजा चप्राड येथे भव्य लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळाव्याचे उद्घाघाटनीय भाषणातुन बोलत होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे अध्यक्षीय भाषणातुन बोलताना पुढे म्हणाले की, आपणही आपल्या भागात विकासाची गंगा आणु शकता त्याकरिता थोडा संयम व मनमिळावू स्वभाव महत्वाचा आहे. विभागात रमेश डोंगरे या छोट्याशा नावाला आपण साथ साथ दिली त्यामुळेच आपण ईथे अनेक विकासकामे या ठिकाणी आणू शकलो. भविष्यात आपणही आपल्या नानाभाऊ करिता साथ देवुन त्यांचे हात बळकट करायला पाहिजे कारण त्यांच्या रुपाने आपल्याला आपल्यातला एक राष्ट्रीय नेता मिळाला आहे असेही ते पुढे म्हणाले. सदर कार्यक्रम हा जि. प. अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या प्रयत्नातून झालेल्या अनेक विकास कामांचे लोकार्पण व शेतकरी मेळावा म्हणून रमेश डोंगरे व चप्राड ग्रामवासी यांच्या प्रयत्नातून आयोजीत करण्यात आला होता. व नाना पटोले यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेवुन अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
सदर कार्यक्रमास जेसा मोटवानी, सभापती मंगला बगमारे, जेष्ठ नेते मधु लिचडे, जि. प. सदस्य शुध्दमता नंदागवळी, जि. प. सदस्य प्रदिप बुराडे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, सेवा दल अध्यक्ष कैलास भगत, जि. प. सदस्य दिपक मेंढे, सरपंच उत्तम भागडकर, सरपंचा कुसुम दिघोरे, उपसरपंच गोपाल घाटेकर व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शेख सर यांनी तर आभार ओमप्रकाश भुते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास ढोरे, राजु सोंदरकर, सोपान ढोरे, ज्ञानेश्वर सावलावार, गिरधर बगमारे, राजेंद्र रामटेके, दिलीप वासनिक, प्रभाकर राऊत, नंदलाल ढोरे, महादेव शेंडे, विलास करंडे व अनेक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours