भंडारा  दि. 1 :- सामान्य रुग्णालय भंडारा येथे जागतिक एडस् दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.पी. पांडे, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव श्री. कोठारी होते.  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिता बढे,डॉ. पियुष जक्कल, डॉ. अपर्णा जक्कल, डॉ. सरला अग्रवाल, डॉ. वंदना कुकडे, डॉ. नाईक, डॉ. उदापूरे, डॉ. सोनवाणे, डॉ. निखील डोकरीमारे, डॉ. प्राची पातूरकर, डॉ. अजय शर्मा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज येरणे, श्रीमती शेख, श्रीमती चकोले, नितीन तुमाने, प्रशांत गभने यावेळी उपस्थित होते. 
जागतिक एडस् दिनानिमित्त कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन युवक-युवतीकरीता  रॅलीचे आयोजन करण्यात होते. ही रॅली जिल्हा रुगणालय-बसस्टॉप- पोस्ट ऑफिस चौक- मुस्लीम लायब्ररी चौक-संविधान चौक- मोठा बाजार यामार्गे जावून रॅलीचा जिल्हा सामान्य रुगणालयात समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान वचन पाळा, नैतिकता पाळा, एडस् टाळा, जगा आणि जगू दया, होऊ या सारे एकसंघ या एच.आय.व्हीचा प्रतिबंध इत्यादी घोषवाक्याचे गजरात रॅलीला सुरुवात करण्यातआली. या रॅलीत 1100 ते 1200 विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थींनी आणि प्राध्यापक उपस्थित होते. 
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. कोठारी यांनी जिल्हयातील विविध न्यायालय व तक्रार निवारणाकरीता निशुल्क सल्ला व माहिती, विविध कायदेशिर माहिती इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. सुनिता बढे यांनी निरोगी राहून सकारात्मक जीवनशैली, एच.आय.व्ही-एडस् विषयावर माहिती तसेच सर्वांनी एचआयव्ही तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.. 
विनोदकुबडे यांनी गर्भवती मातांनी एचआयव्ही तपासणी करणे गरजेचे असून होणाऱ्या बाळाला  कसे एचआयव्ही पासून सुरक्षित करता येईल याबाबत माहिती दिली. प्रेरणा थुल व सविता चंद्रिकापुरे यांनी तांत्रिक माहिती दिली. प्रास्ताविकात मनोज येरणे यांनी जागतिक एडस् दिनाबाबत माहिती देतांना सांगितले की, 1 ते 15 डिसेंबर दरम्यान तालुकास्तरीय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये समुपदेकांद्वारे एचआयव्ही , एडस् विषयावर मार्गदर्शन व आयईसी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. 
जिल्हा एडस् प्रतिबंध व नियंत्रण कक्षाद्वारे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनींकरीता पोस्टर स्पर्धा व पथनाटय स्पर्धाचे आयोजन करण्यात येवून विजयी स्पर्धकांना ट्राफी, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी मान्यवरांद्वारे एचआयव्ही एडसबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. 
असर फाऊडेशनच्या चमुने पथनाटय सादर केले. लिंक वर्कर स्किम प्रकल्प, सारथी कल्याणकारी संस्था भंडारा अशासकीय संस्था व क्षयरोग विभाग यांचेद्वारे आय.ई.सी. स्टॉल व साहित्य वाटप तसेच चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचलन ज्योती श्रावणकर यांनी केले तर आभार मनोज येरणे यांनी मानले. 



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours