भंडारा  दि. 1 :- अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी अल्पसंख्यांक विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी शांतनू गोयल,  मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मनिषा कुरसुंगे, अग्रणी बँक व्यवस्थापक रत्नाकर खांडेकर, कार्यकारी अभियंता दिनेश नंदनवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 
या बैठकीत पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. शिक्षणाच्या संधी वाढविणे, एकात्मिक बाल विकास सेवांची पुरेशी उपलब्धता शालेय शिक्षणाच्या उपलबधतेत सुधारणा करणे, सर्व शिक्षा अभियान, कस्तुरबा गांधी विद्यालय योजना, उर्दू शिक्षणासाठी अधिक संसाधन, मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्यांक समुदायातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मौलाना आझाद शिक्षण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक संरचनेत सुधारणा करणे, गरीबांसाठी रोजगार आणि मजूरी योजना, तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्यवृध्दी, आर्थिक कार्यासाठी कर्जसहाय्य, राज्य आणि केंद्रीय सेवा मध्ये भरती, ग्रामीण गृह योजनेत समान वाटा, अल्पसंख्यांकाच्या झोपडपट्टयामध्ये सुधारणा, जातीय घटकांना आळा घालणे, जातीय गुन्हयासाठी खटले चालविणे व जातीय   दंगलीत बळी पडलेल्यांचे पुनर्वसन करणे या योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. 
अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करुन योग्य लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अल्पसंख्यांक बोलभागात अंगणवाडयासाठी इमारत नसल्यास व जागा उपलब्ध करुन दिल्यास निधी देण्यात येईल, असे ते म्हणाले. अल्पसंख्यांकांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी वर्ग खोल्यांची आवश्यकता असल्यास तात्काळ प्रस्ताव पाठवावा. निधी व मंजूरी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहाची पाहणी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours