मुरबाड, 21 जानेवारी : मुरबाडमध्ये 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने 2 वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या मुलीने रागातून शनिवारी दुपारी अनुष्का या लहानगीची हत्या केली.
आरोपी मुलीने अनुष्काची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह आपल्या घरातील पोट माळ्यावर एक दिवस लपवून ठेवला होता. या हत्येनं मुरबाड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अनुष्काची आई शिवीगाळ करत असल्याचा रागातून संबंधित मुलीने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बरेच तास अनुष्का घरात दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर तिचा घरच्यांनी अनुष्काचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र ती सापडली नाही. अखेर मुरबाड पोलीस ठाण्यात तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर मृत अनुष्काच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या हालचाली संशयापस्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मुलीच्या घराची झडती घेतली असता पोट माळ्यावर  अनुष्काचा मृतदेह पोलिसांना मिळाला.
पोलिसांनी आता आरोपी मुलीला ताब्यात घेत तिची चौकशी केली आहे. संबंधित मुलीने हे कृत्य का केले, हे ऐकताच पोलीसही चक्रावले. अनुष्काची आई येता जाता शिवीगाळ करते या रागातून अनुष्काला मारल्याचे तिने पोलिसांना सांगितलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मुरबाड तालुक्यातील तुळई गावात शोककळा पसरली आहे. एकंदरीत अल्पवयीन मुलं रागाच्या भरात कोणत्या थराला जाऊ शकतात, हे या घटनेवरून अधोरेखित होतं आहे. त्यामुळे या मुलांवर पालकांनी बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं अधोरेखित झालं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours