नागपूर 21 जानेवारी : नागपूरमध्ये गेली दोन दिवस सुरू असलेल्या भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाच्या परिषदेचा रविवारी नागपूरात समारोप झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने या खास परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी समारोपाच्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसला मुंबईतली कोट्यवधींची इंदू मिलची जागा हडपायची होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. इंदू मिलवर होणारं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, लंडनमधलं बाबासाहेबांचं घर, दिल्लीतलं आंतरराष्ट्रीय स्मारक अशा अनेक गोष्टी भाजप सरकारनं पूर्ण केल्या आहेत आणि यापुढेही करू असं मुख्यमंत्री म्हणाले. 2022 पर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours