मुंबई, 03 जानेवारी: बाथरूममध्ये गुदमरून तरुणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या मुलुंड भागात घडला आहे. निपा गाला असं या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे. बाथरूममध्ये गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
आंघोळीदरम्यान गरम पाण्याच्या वाफेमुळं गुदमरून निफाचा मृत्यू झाला. बराच वेळ ती बाथरूममधून बाहेर न आल्याने तिच्या घरच्यांनी दरवाजा तोडला आणि त्यानंतर या सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी निपा तिच्या मित्रांसह लोणावळ्याला गेली होती. बुधवारी ती घरी परतली. त्यानंतर ती अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. खूप वेळा झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून तिच्या पालकांनी दरवाजा ठोठावला. पण निपाने काहीच आवाज दिला नाही. त्यामुळे तिच्या घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी निपा बेशुद्ध अवस्थेत पडली होती.
तिला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत तिच्या मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours