नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात देशावरील कर्जाचे ओझे वाढले आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या साडे चार वर्षात देशावरील कर्ज 49 टक्क्यांवरून वाढले आहे. ही माहिती खुद्द केंद्र सरकारने दिली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्टेटस रिपोर्टनुसार देशावर 82 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. जून 2014मध्ये कर्जाची रक्कम 54 लाख 90 हजार 763 कोटी इतकी होती. यात वाढ होत सप्टेंबर 2018मध्ये ही रक्कम 82 लाख 03 लाख 253 कोटींवर पोहचली आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात कर्ज 48 कोटींवरून 73 कोटींवर पोहोचले आहे. सार्वजनिक कर्जात 51.7 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे एकूण कर्जाच्या रक्कमेत वाढ झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या काळात गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कर्जात देखील वाढ झाली आहे. 2014मध्ये अशा प्रकारे घेण्यात आलेल्य कर्जाचे प्रमाण शून्य टक्के होते. गेल्या साडे चार वर्षात गोल्ड बॉन्ड कर्ज 9 हजार 089 कोटींवर पोहचले आहे.
वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकार मार्केट लिंक्ड बॉरोइंगची मदत घेत असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारकडून 2011पासून कर्जा संदर्भातील स्टेटस रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours