क्राईम रिपाेर्टर संदिप क्षिरसागर
भंडारा---
स्वामी नरेंद्र महाराज दक्षिणपीठ नानिजधाम यांच्या श्री सांप्रदायाचे एक हजार भक्तगण 28 जानेवारीला प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे कुंभमेळ्यासाठी प्रस्थान  करणार आहेत. कुंभमेळयात 1  फेब्रुवारी रोजी सकाळी 9 पासून शाहीस्नानाला सुरुवात होणार आहे.
प्रयाग येथे दर बारा वर्षांनी होणारा देशातील सर्वात मोठ्या कुंभमेळ्यास 14 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या कुंभमेळाव्यात स्वामी नरेंद्र महाराज यांना आखाड्याचे साधु, महंत गंगापूजनासाठी 1 फेब्रुवारीला घेऊन जाणार आहेत. या दुर्मिळ पर्वणीचा लाभ घेण्यासाठी सहभागी होणार्‍या भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. हा उत्सव पारपाडण्यासाठी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाअध्यक्ष मनाेज तळेकर ,जिल्हा निरीक्षक अनिल उरकुळे,तालुका अध्यक्ष लाखनी नागराज काेठेकर,तालुका युवा अध्यक्ष मनिष झिंगरे व सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. कुंभमेळ्यात जास्तीत जास्त भक्तगणांनी सहभागी व्हावे असे आवाहन भंडारा जिल्हा सेवा समितीचे प्रसिध्दीप्रमुख संताेष भुरे यांनी केले आहे।



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours