मुंबई : कुख्यात दहशतवादी संघटना आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणांकडून घातक रसायनं जप्त करण्यात आली आहे. या जीवघेण्या रसायनांचा वापर करून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात विषप्रयोग करण्याचा डाव होता का? या अनुषंगानं एटीएसचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्र एटीएसनं औरंगाबाद आणि मुंब्रामधून 9 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले तरूण हे उम्मत-ए-मोमदिया संघटनेशी निगडीत असल्याचं तपासात उघड झालं आहे.
आरोपींकडून ग्लिसरीन, युरिया, एसिटॉन सारखी जीवघेणी रसायनं जप्त करण्यात आली आहेत. औरंगाबादमधून अटक करण्यात आलेल्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours