चंद्रपूर : जिल्हयात सख्या भावासमोर बहिणीला वाघाने फरफटत नेल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका येथील जोगापुर-खांबाडाच्या जंगलात घडली. वर्षा तोडासे(वय 45) असं हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे.
वर्षा आपला भाऊ मनोज शेडमाके (30) आणि सासू अनुसया तोडासे (60) यांच्यासोबत राजुरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रंमाक 177 मध्ये जंगलात झाडूच्या शिलका शोधण्यासाठी गेले होते. हे तिघेही जन एकमेकांच्या जवळपासच होते. त्याच झुडपात वाघ दबा धरून बसला होता.
अन् संधी मिळताच त्याने वर्षावर हल्ला केला. वाघाने हल्ला करताच वर्षा ओरडली, तितक्यात हाकेच्या अंतरावर असलेल्या भावाने लाकूड घेऊन पाठलाग केला. भावाने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न प्रयत्नच राहिले. वाघाने भावाच्या समोरच बहिणीला फरफटत घेऊन गेला. यात वर्षाचा मृत्यू झाला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours