क्राईम रिपाेर्टर संदिप क्षिरसागर
भंडारा- मकर संक्रातीनिमीत्त दर वर्षी पतंग उडवने काही नागरिक,तरुण मुले यांना पतंग उडवन्याचा माेठ्या प्रमाणात छंद असताे.एकमेकाची पतंग काटन्यासाठी आर्थिक व विनाआर्थिक शर्यती लावल्या जातात.पुर्वि काळी हाताने बनवलेल्या साधे धागेच्या मंजा तयार करुन वापरला जात असे,ताे धागा पटकन तुटत हाेता त्यामुळे काेनत्याही प्राण्याची व नागरिकांच्या जिवाची हाणी हाेत नव्हती,आता नायलॉन च्या धाग्याला काचेची भुकटी टाकुन मंजा तयार केला जाताे.नॉयलान चा धागा हा मजबुत व सक्त असल्यामुळे ताे तुटत नाही त्यामुळे अनेक पशु पक्षींचा बळी घेतल्या जाते.मानसाच्या मानेवरुन गेल्यास मानसाची मान सुद्धा कापुन जिव जान्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे पर्यावरणाला सुद्धा माेठा धाेका निर्माण झाला आहे.याची दखल घेवुन यावर शासनाने बंदी घातली हाेती.मात्र आजही नायलॉन मंजाचा पतंग उडविण्यासाठी माेठ्याप्रमाणात वापर केला जात असुन बाजारात खुलेआम त्याची विक्रि सुरु आहे.यावर काेणतेही अधिकारी कार्यवाही करीत नाही हे दुर्दैव आहे.म्हणुन पशुपक्षी व पर्यावरणाला धाेका निर्माण असलेल्या नॉयलान मंजा विक्रि करणाऱ्या दुकानदारांवर ,कंपनीवर तात्काळ कार्यवाही करुन गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, पाेलिस अधिक्षक भंडारा यांना अखिल भारतीय भ्रष्ट्राचार विराेधी सामाजिक मंच भंडारा यांच्याकडुन देण्यात आले आहे.निवेदन देताना प्रामुख्याने विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी, विष्णुदास लाेणारे,सचिन मेश्राम,दिपक वाघमारे,राजेश तांडेकर,राहुल नागदेवे,जालिंदर तांडेकर,सुरज निबांर्ते तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते.








Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours