सुनिता परदेशी मुख्य संपादिका. .
नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या नाकर्तेपणा

भंडारा : नगर परिषद भंडाराला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी १० कोटी ८१ लक्ष ५२
हजार ५४० रुपये मिळाले. मात्र खासदार यांच्या हेकेखोरपणामुळे हा पैसा परत
जाण्याच्या मार्गावर आहे. या निधीसाठी आमदार रामचंद्र अवसरे यांनी विशेष
प्रयत्न केले होते. खासदार झालेल्या सुनील मेंढे यांच्या ईगोमुळे हा निधी
सध्या पडून आहे.
नगर परिषदांना वैशिष्ट्यूपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोेक तरतूद
लेखाशीर्ष अंतर्गत एकूण ३२ कामांना निधी मंजूर करण्यास तत्वत: मान्यता
प्रदान केली होती. मात्र शासनाचा हा निर्णय रद्द करण्यात आला. यानतर नगर
विकास विभागाच्या २० डिसेंबर २०१८ च्या निर्णयानुसार ३२ कामांना मंजूर
निर्णय रद्द करून सन २०१७-१८ च्या नगर पालिका क्षेत्रात मूलभूत
सोयीसुविधांचा विकासांतर्गत ४८ कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता.
यानंतर नगर विकास विभाग शासन निर्णय ८ मार्च २०१९ ला नगर परिषदांना
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान- ठोक तरतूद लेखाशीर्ष नुसार भंडारा
जिल्ह्याला एकूण १४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यात भंडारा
नगरपरिषदेला १० कोटी तर पवनी नगर परिषदेकरिता ४ कोटी रुपयाचे अनुदान
वितरित करण्यात आले आहेत.
१० कोटी ८१ लक्ष मंजूर पण कामाविना पडून
भंडारा नगर  परिषदेला ८ मार्च २०१९ ला १० कोटी ८१ लक्ष ५२ हजार ५४० रुपये
मंजूर झाले. यानंतर भंडारा नगर परिषदेमध्ये नगरसेवकांमध्ये पैशासाठी
वादावादी सुरू झाल्या. भंडारा नगर परिषदेने परत ठराव घेवून मंजूर ४८
कामांपैकी केवळ ३८ कामांवरच १० कोटी ८१ लक्ष ५२ हजार ५४० रुपये खर्च होणर
असल्याचे पत्र ३१ मे २०१९ ला दिले.
यानंतर एका नगरसेवकाने आपले वजन खर्च करून मुख्यमंत्र्यांकडून या कामातील
बहुतांश कामे आपल्याकडे करून घेतल्याने नगराध्यक्ष सुनील यांची जळफळाट
झाली. त्यामुळे नगराध्यक्षाने या कामांना सुरू करू नये असा दम
मुख्याधिकारी यांना दिला आहे. कामे मंजूर आहेत पैसाही आला आहे.
नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. पण पद,प्रतिष्ठा व पैसा
यामुळे १० कोटी ८१ लक्ष ५२ हजार ५४० रुपये भंडाराच्या शासकीय तिजोरीत
गेल्या चार महिन्यापासून कामाविना पडून आहेत. जर निवडणुकांची आचारसंहिता
लागली तर हा संपूर्ण निधी परत जाईल पण नगराध्यक्ष ते खासदार असा प्रवास
करणारे सुनील मेंढे हे या धनावर फणा काढून बसले आहेत. आता त्यांना कोण
बाजुला करणार.
१० कोटीचे श्रेय आमदार रामचंद्र अवसरे यांचे
भंडारा व पवनी नगर परिषदेला विशेष निधी मिळावा म्हणून भंडारा विधानसभा
क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी ही मागणी विधानसभेत केली होती.
यााबाबत मा. वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दि. ६ जुलै
२०१८ ला याबाबत आमदार रामचंद्र अवसरे यांना पत्र पाठवून भंडारा नगरपरिषद
क्षेत्रातील विकास कामांसाठी १० कोटी रुपयाच्या निधीची तरतूद जुलै २०१८
च्या पुरवणी अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
शासनाने आमदार रामचंद्र अवसरे यांची मागणी पूर्ण झाल्याचे लेखी कळविले.
मात्र भंडारा नगर परिषदेला आमदार रामचंद्र अवसरे यांच्या मदतीचा विसर
झाला आहे.
आमदार अवसरे यांना न विचारताच या १० कोटी रुपयाची परस्पर विल्हेवाट
लावण्याचे भंडारा नगराध्यक्षाचे मनसुबे आहेत. भंडाराचे नगराध्यक्ष
म्हणजेच जिल्ह्याचे खासदार साहेबांना सद्बुद्धी येवो व अडलले नगर
परिषदेची कामे मार्गी लागो एवढेच मागणे आहे.  
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours