नागपूर : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आता राज्य सरकारने तळीरामांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 3 हजार लोकसंख्या असलेल्या गावात दारू दुकानाला परवानगी देण्याचा निर्णय राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने घेतला, असल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
'लोकांनी लाखो रुपये खर्च करून गुंतवणूक केली आहे. तसंच 80 हजार तरुणांना रोजगार मिळावा आणि अवैध दारू थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला', असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं आहे.
हायवेरील दारूची दुकाने पुन्हा सुरू होणार!
'सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर, हायवे लगत 500 मीटर अंतरावर असलेली दारूची दुकाने, बार बंद झाली होती. पण, यामुळे उत्पादन शुल्क विभागाचा महसुल वाढला याचाच अर्थ दारू पिणारे कमी झाले नाही, धाब्या धाब्यावर आणि हॉटेलमध्ये लोकं अवैध दारू पित होते. त्यामुळे नियमानुसार दारू मिळावी यासाठी हा निर्णय घेतला', असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours