मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेबांना पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच 'सरकाराला उशिरा का होईना जाग आली, अशी टीकाही त्यांनी केली. 
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारासह पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उद्योजक अनिलकुमार नाईक यांना 'पद्मविभूषण', डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण तसंच समाजसेवक स्मिता आणि रवींद्र कोल्हे आणि नाटककार वामन केंद्रे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहे. 
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक नानाजी देशमुख आणि गायक भूपेन हजारिका यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. नानाजी देशमुख आणि भूपेन यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर, अभिनेता मनोज वाजपेयी, प्रभूदेवा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours