राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता.
योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झाला. मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत. मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करते.
Post A Comment:
0 comments so far,add yours