नवी दिल्ली : महाराष्ट्रात आघाडीचं जागावाटपाचं गणित अखेर जमलं आहे. दिल्लीत झालेल्या चर्चेच्या अखेरच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेसला झुकतं माप मिळालं आहे. राज्यात काँग्रेस 25 तर राष्ट्रवादी 23 जागांवर लोकसभेची निवडणुक लढणार आहे. बुधरावी रात्री नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात चर्चा झाली.

त्या चर्चेतून नवं सूत्र समोर आलं. यवतमाळ आणि पुण्याची जागा काँग्रेसला मिळाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची बोलणी गेले काही दिवस मुंबईत सुरू होती. त्यात दोनही पक्षांनी अर्ध्या अर्ध्या जागा लढवायचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी 24 जागांवर लढणार होते.

या चर्चेत 8 जागांवर पेच निर्माण झाला होता. त्यावर आज दिल्लीत चर्चा झाली आणि तोडगा काढण्यात आला. त्यात काँग्रेसला 25 तर राष्ट्रवादीला 23 जागा आल्या. समविचारी पक्षाना काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून जागा देणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours