रत्नागिरी, 07 जानेवारी : रत्नागिरी शहरातील उद्यमनगर इथं आनंद क्षेत्री या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्याच्या मित्रानेच त्याची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.
आनंद क्षेत्री याचा अधिकृत सावकारी व्यवहार असल्याचं समजतं आहे. तो आज रात्री त्याच्या 5 मित्रांसह चारचाकी गाडीतून जात असताना गाडीतल्याच त्याच्या एका मित्राने रिव्हॉल्वर काढला आणि आनंदवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. ही घटना घडताच क्षेत्री याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे रत्नागिरी सध्या हादरलं आहे.
या प्रकारावेळी नेमका आनंद हा गाडी चालवत होता. त्यामुळे गोळी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी संरक्षक भिंतीवर धडकली. आनंद रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या 5 मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर सावकारी वादातून आनंदची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून लावण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours