मुंबई, 07 जानेवारी : वीज, बँक आणि बेस्टचे कर्मचारी संपावर जाणार आहे. त्यामुळे याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. खासगीकरणाच्या विरोधासह वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले आहेत. तर मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टमध्ये सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मुद्द्यांवर बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. तर बँक कर्मचारी उद्या आणि परवा संपावर जाणार आहेत.
शासकीय वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे राज्यभरातील कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. 3 कंपन्यांचे तब्बल ८३ हजार कर्मचारी ७२ तास संपावर असणार आहेत.
हे कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्यातील वीज निर्मिती आणि वितरण ठप्प होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कस फेडरेशन, सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन, वीज कामगार युनियन संपात सहभागी झाले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours