अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ख्यातनाम लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाला येऊ नये असे पत्र पाठवून त्यांचा अपमान केला आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या बाबतीत देशात अशी अपमानजनक घटना कधीही घडली नाही. काही अपरिहार्य कारणास्तव व आम्ही आपले कमिटमेंट पुर्ण करू शकत नाही त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाला येऊ नका असे पत्र संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांनी सहगल यांना पाठविले.
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीने मराठीच्या महामेळाव्याचे उद्घाटन इंग्रजी साहित्यीकाकडून होऊ नये अशी भुमिका मांडली होती. मात्र त्यामध्ये सहगल यांच्यासारख्या महान लेखिकेचा अशा प्रकारे अवमान व्हावा असा यामागे हेतु नव्हता. त्यांच्या अतुलनीय कार्याप्रती आम्ही आदरच व्यक्त केला होता. 
याबाबत आयोजकांनी आधीच विचार करायला पाहिजे होता. कार्यक्रम ऐन काही दिवसांवर असतांना त्यांना पत्र पाठवून असा अपमान केल्याने केवळ जिल्ह्याचीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राची मान संमेलन आयोजकांमुळे खाली गेली आहे. आयोजकांनी या अक्षम्य चुकीसाठी नयनतारा सहगल व संपुर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. शिवाय या बेजबाबदारपणाबद्दल अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा द्यावा. तसेच कमकुवत आयोजकांकडून संमेलन आयोजनाची जबाबदारी काढून घ्यावी. संमेलनाच्या आयोजनाचे अधिकार जिल्हाधिका-यांनी स्विकारावे अशी आमची मागणी आहे.

देवानंद पवार
निमंत्रक, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समिती, यवतमाळ
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours