मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा चौथ्या दिवशीही संप सुरूच आहे. या संपावरून मनसेनं सरकारला इशारा दिला आहे. 'संपावर तोडगा निघत नसणार नसेल तर मनसे आपल्या स्टाईलने सोमवारी आंदोलन करणार', अशी भूमिका मनसेनं मांडली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला दिशा देण्याचे आदेश यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते.
काल गुरुवारी संपावर तोडगा न निघाल्यामुळे बेस्ट संपाबाबत पुढची रणनिती ठरवण्यासाठी मनसे कर्मचारी संघटनेची दुपारी तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला मनसे महानगर कर्मचारी संघटनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत संपावर तोडगा निघत नसल्यानं मनसे स्टाईल आंदोलनाची भूमिका या बैठकीत घेण्यात आली आहे. 'महापालिका व्यवस्थापकाकडून जर तोडगा निघणार नसेल तर सोमवारी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर तोडगा काढणार, असा इशारा मनसेनं बेस्ट व्यवस्थापकांना दिला. तसंच, ' रस्त्यावर तमाशा करण्याची वेळ आणू नका, आमच्या आंदोलनानंतर जी परिस्थिती उद्भवणार त्याला प्रशासन जबाबदार राहिल', असा इशाराही त्यांनी दिला. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे
Post A Comment:
0 comments so far,add yours