(२४,७४,०००/- रु.दंड वसुल)
क्राईम रिपाेर्टर संदिप क्षिरसागर
नागपुर- सद्या गाैण खनिज उत्खनण बाबत रेती घाट बंद असुन महसुल विभागामार्फत तसेच जाहिर करण्यात येऊनही काही समाजकंटक चाेरी च्या मार्गाने मध्यप्रदेश येथील रेती घाटाची बाेगस रायल्टी तयार करुन गाैणखनिज ज्याची गाेंदिया,भंडारा, माैदा मार्ग वाहतुक करुन शासनाचा महसुल बुडवुन नियमाची पायमल्ली करित आहे.अश्या गाेपनिय माहितीवरुन पाेलिस अधिक्षक नागपुर ग्रामिण श्रि राकेश आेला यांच्या निर्देशनाने तसेच महसुल विभाग नागपुर ग्रामिण यांनी संयुक्त माेहीम आयाेजित करुन दि.५-१-२०१९ राेजी माैदा मार्गावर सापडा रचला असता पाैनी,भंडारा येथील रेतीघाटातुन अवैधरित्या रेती वाहतुक करतांना टिप्पर आढळुन आले त्यांना रितसर थांबवुन सहानिशा केली असता विना रायल्टि व क्षमतेपेक्षा जास्त रेती भरुन दिसुन आली म्हऩुन सदर वाहनावर महसुल विभाग तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतिने एकुण १० टिप्परावर कार्यवाही करण्यात आली या १० टिप्परामधे एकुण ८० ब्रॉस रेती मिळुन आल्याने महसुल विभागातर्फे २४,७४,०००/- रु. दंड वसुल करुन शासन जमा करण्यात आला.तसेच प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सुद्धा कार्यवाही करण्यात आली आहे.सदर ची कार्यवाही राकेश आेला पाेलिस अधिक्षक नागपुर ग्रामिण, माेनिका राऊत अप्पर पाेलिस अधिक्षक नागपुर ग्रामिण, कैलाश गावंडे पाेलिस उपअधिक्षक( गृह) यांच्या मार्गदर्शनात संजय पुरंदरे पाेलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांचे विशेष पथक मधील अधिकारी पाेलिस उपनिरीक्षक अनिल ऱाऊत ,नरेन्द्र गाैरखेडे,बाबा केचे ,पाे.ह.चंन्द्रशेखर घडेकर,राजेन्द्र सनाेडिया,अमाेल वाघ,विपीन गायधनी,चालक साहेबराव बहाडे,अमाेल कुथे सर्व स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण व बि.टी.टेडे तहसीलदार कामठी ,प्रशांत सांगळे तहसीलदार माैदा यांनी संयुक्त कार्यवाही केली आहे ।
Post A Comment:
0 comments so far,add yours