मुंबई, 11 जानेवारी : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपावर आजही कोणताही निर्णय होऊ शकला नाही. महापौर बंगल्यात पार पडलेल्या 7 तासांच्या बैठकीतही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळं सलग चौथ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. 
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबईतील महापौर बंगल्यात पार पडलेल्या बैठकीला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांच्याशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट संप प्रकरणी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मुख्य सचिवांनी मंत्रालयात बोलावलं होतं. त्यांनी संपावर तोडगा काढण्यासाठी सुचनाही दिली होती.
राज ठाकरेंची भेट
बेस्टच्या कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. आज तिसऱ्या दिवशी सकाळी बेस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला असून संघटनेला एकत्र राहण्याचे आश्वासन दिले होते. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours