अंबरनाथ: छोट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधल्या स्वामीनगरमध्ये घडला आहे. किरकोळ कारणावरून लहान भावाने ही हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
रागात एखादा काय करेल याचा काही नेम नाही. य़ाचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल. शुल्लक कारणामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाला लहान भावाने चक्क मोठ्या भावाची हत्त्या केली. स्क्रू ड्रायव्हरने गळ्यावर आणि मानेवर वार करत भावाने भावाला संपवल्याने नात्यांची रांगोळी झाली असं म्हणायला हरकत नाही.
स्क्रू ड्रायव्हरने गळ्यावर वार झाल्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला आणि त्यात गणेश सुब्बरायन याचा जागीच मृत्यू झाला आहे. वीरेन सुब्बरायन याने ही हत्या केली आहे. हे दोघे सख्खे भाऊ आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्या करण्यासाठी वापरलं गेलेलं स्क्रू ड्रायव्हर ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात येत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours