बालाकोट : भारतीय हवाई दलानं एलओसी पार करत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवला. जवळपास 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं हा हल्ला केला. एलओसीपासून 80 किती आत घुसून भारतीय हवाई दलानं ही कारवाई केली आहे. यामध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांसह 5 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तर जखमींवर सध्या रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बालाकोट येथे ही कारवाई करण्यात आली आहे. 12 मिराज विमानांनी पाकच्या नाकावर टिच्चून ही कारवाई केली. यावेळी दहशतवाद्यांच्या तळावर 1 हजार किलोचा बॉम्ब टाकून त्यांचे तळ उद्धवस्त करण्यात आले.
निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा .
पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान बालाकोट येथे Air strike करण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतल्याची माहिती न्यूज18च्या सुत्रांनी दिली आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना माफी नाही असा इशारा दिला होता. त्यानंतर 15 दिवसामध्ये ही कारवाई करण्यात आली.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours