बीड : रविवारी सकाळच्या दरम्यान बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. बीडच्या सोलापूर-धुळे महामार्गावर पाली इथे हा अपघात झाला आहे. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

सोलापूर-धुळे महामार्गावर पाली येथून जात असताना ट्रक आणि अल्टो कारची एकमेकांना टक्कर झाली आणि त्यातून हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या अपघातात नववर दगावल्याची माहिती समोर येत आहे.

न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्या सांगण्यानुसार मृतांमध्ये एका पुरुषाच्या हाताला लग्नाचे हळकुंड बांधण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे नवीनच लग्न झालं असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ नजिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours