अहमदनगर, 08 फेब्रुवारी : पुणतांबा शेतक-यांच्या लेकींच अन्नत्याग आंदोलन गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे. यात आता त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. आंदोलन करणाऱ्यांपैकी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालवल्याने तिला नगर इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रात्री १ वाजेच्या दरम्यान शुभांगीला नगर इथल्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्या मागण्य़ांवर कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्याने मुली आंदोलनावर अजूनही ठाम आहेत. तर आज पालकमंत्री राम शिंदे उपोषणस्थळी मुलींची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
या आंदोलनात निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या 3 तरुणी सहभागी झाल्या होत्या. त्यातल्या शुभांगीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 5 दिवसांपासून त्यांचे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. परंतु, आज 5 दिवस होवून गेले आहे. मात्र, सरकारमधील कोणीही तिकडे फिरकले नाही.
तर या मुलींच्या मदतीला पुणतांब्यात आज सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सरकार यांच्या मागण्य़ांकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावात शेतकऱ्यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या , पिकाला हमीभाव द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours