दिल्ली, 7 फेब्रुवारी : देशात मराठी पंतप्रधान होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच एक मराठी मुलगी स्वीडनच्या पंतप्रधानांना सल्ला देणार आहे. भारतीय वंशाच्या असलेल्या नीला विखे पाटील यांनी भारताचा झेंडा अटकेपार लावला आहे. त्या स्वीडनच्या पंतप्रधांनांच्या सल्लागारपदी म्हणून काम करणार आहेत.
गेल्या महिन्यात स्टीफन लोफवन यांनी स्वीडनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या सल्लागार म्हणून 32 वर्षीय नीला विखे पाटील काम करणार आहेत. त्या शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.
स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात नीला यांच्याकडे आर्थिक, कर, वित्तीय बाजार, अर्थसंकल्प आणि गृहनिर्माण खात्यांचे काम असणार आहे. नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला असून त्या महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्य आहेत. 
नीला या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांच्या पुतणी आहेत. नीला यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले आहे. याशिवाय माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours