औरंगाबाद, 07 फेब्रुवारी: जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या जरंडी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ झाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेचा मुख्याध्यापक हरिदास काटोले यानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचा मुलींचा आरोप आहे.
मुलींच्या समोर अश्लील भाषेत बोलणे, मुलींच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवणे ओढणी सरळ करण्याच्या बहाण्याने अशोभनीय कृत्य करणे, मुली बाथरूमला गेल्या असता त्यांच्या माघे माघे जाणे, अश्लील कृती करणे असे धक्कादायक प्रकार हा मुख्याध्यापक करत होता.
याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बीडीओ महारु राठोड यांनी याबाबत चौकशी केली होती. या चौकशीत मुलींनी धक्कादायक जबाब दिले होते. त्यानंतर या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. शिक्षकविरोधात तक्रार आल्यापासून हा शिक्षक फरार झाला आहे. बीडीओ यांचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. उद्या पोलिसांना अहवाल देऊन तक्रार दाखल करण्याबाबत सूचना देणार असल्याचे बीडीओनी सांगितलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours