जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी
भंडारा - भारतीय ऐक्य व पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ बहाद्दुर सैनिकांच्या स्मृतीस आदरांजली म्हणुन कॉन्साेर्टियम ऑफ इंडियन पेट्राेलियम डिलर्स यांच्याशी संलग्न असलेले देशातील सर्व पेट्राेल पंप आज बुधवार दि.२० फेब्रुवारी २०१९ राेजी सायंकाळी ७ वाजता २० मिनीटा साठी बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व पेट्राेल पंपा वरती शहीदांना आदरांजली वाहणारे फलक लावले जातील.२० तारखेला सायंकाळी ७ ते ७ :२० पर्यंन्त पेट्राेल पंपावरिल दिवे मालवले जातील या विस मिनीटासाठी पंपावरिल सर्व व्यवहार बंद राहतील.महाराष्ट्रातील पेट्राेल डिलर संघटना ( फामपेडा) व जिल्ह्यातील सर्व पेट्राेल डिलर्स या शहीदांच्या आदरांजली मधे सहभागी असतील.पेट्राेल डिलर्स वेल्फेअर अँसाे. चे अध्यक्ष भुषन भाेसले यांनी कळविले आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours