पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी आणि काश्मिरी नागरिकांविरोधातील रोष काही कमी होताना दिसत नाही. पुलवामातील आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाल्यानंतर डेहराडून कॉलेजमधील काश्मीरच्या विद्यार्थ्यांचा वादग्रस्त मेसेज व्हायरल झाला. त्यानंतर विद्यार्थ्याचं निलंबन करण्यात आलं. तर, एका विद्यार्थ्याला समन्स पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांचं निलंबन केल्यानंतर आता खासगी कॉलेजमधील काश्मिरी डीनला देखील निलंबित करण्यात आलं आहे.
विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दलाच्या दबावापोटी ही कारवाई करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर डेहराडूनमध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांविरोधात रोष वाढत आहे. काही विद्यार्थ्यांनी डेहराडूनहून काश्मीर जाणे पसंत केलं. तर, काही विद्यार्थ्यांनी खोलीमध्येच राहणं पसंत केलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours