शहीद जवान संजय राजपूत
श्रीनगर, 15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात 44 जवान शहीद झाले आहेत. या शहिदांमध्ये संजय राजपूत आणि नितीन राठोड या महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे.
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथले आहेत. तर शहीद नितीन राठोड हे बुलढाण्यातीलच लोणार तालुक्यातील आहेत. या जवानांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या गावी मोठा आक्रोश करण्यात आला.
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ला :
पुलवामा येथील अवंतीपोरा येथील गोरीपोरा सीआरपीएफच्या ताफ्यावर IEDद्वारे हल्ला केला. हल्लाजैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.या घटनेनंतर पुलवामा येथे असलेल्या सर्व जवानांना, राज्य पोलीस दल आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतिपोरा येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. तसेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील पुलवामा, शोपियां, कुलग्राम आणि श्रीनगर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीरमधील हा गेल्या तीस वर्षांतला सर्वात मोठा मानला जात आहे.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours