बुलडाणा, 23 फेब्रुवारी : चिखली तालुक्यातील धोत्राभनगोजी इथं एका कार्यक्रमात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला आहे. काँग्रेस आमदार राहुल बोन्द्रे आणि भाजपच्या श्वेताताई महाले यांच्यामध्ये भाषणातून शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरा-समोर आले आणि त्यातूनच एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाली.
वाद झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. यावेळी हजारांहून अधिक जमाव पोलीस स्थानकात दाखल झाला. त्यानंर आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला.
निवडणुकीच्या तोंडावर चिखलीतील राजकारण चांगलेच तापले असुन कॉग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे आणि महिला बालकल्याण समिती सभापती श्वेताताई महाले यांच्या मध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली असुन धोत्राभनगोजी इथं घडलेल्या घटनेचे पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये देखील दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होती. 
दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे. दोन गटात झालेल्या या वादानंतर शहरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. पण आता हा तणाव निवळला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours