मुंबई, 23 फेब्रुवारी : 'बाळासाहेब ठाकरे हे खरे मर्द होते तर उध्दव ठाकरे घुटनेटेकू आहेत,' असं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'बाळासाहेब सत्तेसाठी कुणाकडेही गेले नाहीत. पण उद्धव ठाकरे भाजपसमोर गुडघे टेकत आहेत,' असं म्हणत आझमी यांनी शिवसेना-भाजप युतीवर टीका केली. तसंच यावेळी त्यांनी काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी एका जागेची मागणीदेखील केली आहे. आघाडीने एक जागा द्यावी अन्यथा राज्यात समाजवादी दहा जागा लढवणार, असं आझमी म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours