मुंबई, 23 फेब्रुवारी : 'शिवसेना आणि भाजप युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आज पहिल्यांदा शिवसेनेची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व खासदार, जिल्हाप्रमुख, तालुखाप्रमुख हे उपस्थितीत असणार आहेत.
लोकसभा निवडणुका येत्या काही दिवसांतच घोषीत होणार आहेत. त्यापूर्वी युतीचे उमेदवार म्हणून लढताना निवडणूक रणनीती ठरवली जाणार आहे. ईशान्य मुंबई आणि जालना लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी उद्धव ठाकरे कशी दूर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या दोन्ही मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार किरीट सोमय्या आणि रावसाहेब दानवे यांच्याविरोधात स्थानिक शिवसैनिकांमध्ये संताप आहे.
भाजप खासदारांविरोधात आक्रमक असलेल्या शिवसैनिकांना काय आदेश मिळणार आणि निवडणुकीत काय भूमिका बजावणार याकडे भाजपच्या नेत्यांचंही लक्ष लागल्याचं चित्र आहे. कारण युतीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणंही गरजेचं आहे.
भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली पण महायुतीत वाढली धुसपूस
भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली पण महायुतीत धुसपूस वाढली आहे. युतीच्या नादात आम्हाला वाऱ्यावर सोडलं का ? अशी भावना भाजपच्या घटक पक्षात निर्माण झाली आहे. 'शिवसेना भाजप युती व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो. मात्र युतीकडून जाहीर झालेल्या जागावाटपामध्ये आम्हाला एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे मी स्वतः नाराज असून संपूर्ण रिपब्लिकन जनतेतही प्रचंड नाराजी आहे,' असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours