नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपशी युती होणार नाही अशी वक्तव्य केली जात असली तरी दुसऱ्या बाजूला दोन्ही पक्षातील काही नेते युती होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेने देखील युती होण्याची आशा अद्याप कायम असल्याचे संकेत याआधी दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र येत आहेत. त्यामुळेच भाजपला कोणत्याही परिस्थितीत मित्रपक्षांची नाराजी दुर करत त्यांना सोबत घ्यायचे आहे. याचाच एक भाग म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या चर्चेत शिवसेनेने राज्यात आम्हीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असू असे पुन्हा एकदा स्पष्ट केल्याचे कळते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours