पुणे, 12 फेब्रुवारी : पुण्यातील माहिती आधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला आहे. हा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला असून शिरसाट यांच्या कुटुंबाने खुनाचा संशय व्यक्त केला आहे. 
माहिती अधिकार कार्यकर्ते असलेले विनायक शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होते. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ते बेपत्ता झाले होते. आता मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
विनायक शिरसाट यांच्या मृत्यूबाबत समल्यानंतर त्यांचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. कारण त्यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून आता अधिक तपास करत आहेत. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours