मुंबई, 12 फेब्रुवारी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याअंतर्गत मिळाणाऱ्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून हेक्टरी मर्यादा ठेवण्यात आली आहे. ही मर्यादा वाढवण्याचा वा काढूनच टाकण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात चर्चा होईल, अशी शक्यता आहे. 
दुसरीकडे, केंद्र सरकारनं केलेल्या मदतीच्या घोषणेपेक्षा अधिक काही रक्कम राज्य सरकारनं द्यावी, अशी सूचनाही केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली होती. त्याबाबतही आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य सरकारही शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे.
काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना?
दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही योजना लागू होणार आहे. पण विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती असली तरी ती दोन हेक्टर म्हणजे पाच एकरपेक्षा अधिक आहे. आणि सध्या या भागात तीव्र दुष्काळ आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours