नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : 'राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाली केली आहे. मोदींनी राफेलप्रकरणी मध्यस्थाची भूमिका वठवली,' असा थेट आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच राफेल प्रकरणात मोदींनी संरक्षण कराराबाबतची गोपनीयता मोडली आहे, या मुद्द्यावर ते जेलमध्ये जाऊ शकतात, असंही राहुल गांधी म्हणाले.
राफेल प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
- अनिल अंबानींना फायदा पोहचण्यासाठी मोदींकडून प्रयत्न
- राफेल प्रकरणी आणखी एक ईमेल समोर आला आहे
- पंतप्रधान मोदींकडून गोपनियतेचा भंग
- संरक्षणविषयक गोपनीयतेचा मोदींकडून भंग
- राफे प्रकरणात भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांबाबत आता चौकशी झाली पाहिजे
- पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे
- अनिल अंबानींना संरक्षण कराराची माहिती आधीच कशी मिळाली? याचं उत्तर फक्त मोदीच देऊ शकतात.
- तुम्ही राफेलमध्ये भ्रष्टाचार केला नसेल तर चौकशी का टाळत आहात? मोदींना सवाल
- विरोधकांची काय चौकशी करायची ती करा, पण राफेलचीही चौकशी करा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours