मुंबई, 01 फेब्रुवारी : नरेंद्र मोदी सरकारचा सहावा आणि शेवटचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे. त्याला आता फक्त 15 दिवस राहिले आहेत. लोकसभेच्या निडणुका तोंडावर आल्याने या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अर्थमंत्रालयात जोरदार हालचाली सुरू आहे. आकडेमोड केली जातेय. नव्या योजना तयार केल्या जाताहेत यात महाराष्ट्राला काय मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी हजारो कोटींच्या योजना जाहीर केल्या आहेत.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यातल्या अनेक योजना या केंद्राच्या मदतीवर अवलंबून असून या अर्थसंकल्पात त्यासाठी किती तरतूद केली जाते हे पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारचा सहावा आणि शेवटचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडण्यात येणार आहे. त्याला आता फक्त 15 दिवस राहिले आहेत. लोकसभेच्या निडणुका तोंडावर आल्याने या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अर्थमंत्रालयात जोरदार हालचाली सुरू आहे.

आकडेमोड केली जातेय. नव्या योजना तयार केल्या जाताहेत असं व्यस्त वेळापत्रक असताना अर्थमंत्रीच सुटीवर असल्याने त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण सर्व काम नियोजनानुसारच होत असल्याची माहिती अर्थमंत्रालयातल्या सूत्रांनी दिली.

जेटली अमेरिकेत

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत. 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस त्यांना अमेरिकेत राहावं लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचं किडणी प्रत्यारोपणाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मोदी सरकारचा सहावा अर्थसंकल्प नक्की कोण मांडणार याची उत्सुकता निर्माण झालीय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours