मुंबई, 1 फेब्रुवारी : ऑनलाईन मोबाईल गेम्सनी तरुणांना अक्षरश: वेड लावलंय. यातही पबजीच्या आहारी गेलेल्यांची संख्या जास्तच आहे. आता याला लोकांचा विरोधही वाढत चालला आहे. या गेमवर बंदी घालावी यासाठी मुंबईतील 11 वर्षाचा मुलगा उच्च न्यायालयात पोहचला आहे. त्यानं म्हटलं आहे की या गेममुळे हिंसा, हल्ला आणि सायबर हल्ल्याला प्रोत्साहन मिळत आहे. 
मुंबईत राहणाऱ्या अहद निजामने त्याच्या आई मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निजामने म्हटलं आहे की, न्यायालयाने पबजीवर बंदी घातली पाहिजे आणि याबाबत महाराष्ट्र सरकारला आदेश दिले पाहिजेत.
पबजी गेम 2017 मध्ये लॉन्च झाला होती. त्यानंतर गेमची लोकप्रियता झपाट्याने वाढली. लहान मुलांपासून तरूणापर्यंत या गेमचीच क्रेझ दिसू लागली. या गेमवर जम्मू काश्मीरमध्येही बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या गेममुळे मुलांवर वाईट परिणाम होतात असं म्हटलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात या गेमचा उल्लेख केला होता. एका आईने आपला मुलगा ऑनलाईन गेममुळे अभ्यास करत नसल्याचे म्हटलं होतं. तेव्हा पंतप्रधान मोदींनी, Pub-G वाला है क्या? असं विचारलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours