01 फेब्रुवारी : सेनेगलमध्ये अटक करण्यात आलेल्या गँगस्टर रवी पुजारीविरोधात शेवटची तक्रार सहार पोलीस स्टेशनला देण्यात आली होती.
मुख्तार शेख उर्फ पप्पु नामक इसमाला धमकी आणि त्याच्यावर गोळीबार रवी पुजारीच्या शुटरकडून करण्यात आला होता. या तक्रारीनंतर रवी पुजारीच्या शोधाची चक्र फिरली आहेत.
सेनेगलमध्ये अँथनी रॉर्डिक्स नावाने बनावट पासपोर्ट बनवताना रवी पुजारीला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर आयबीच्या माहितीनुसार, तो भारतीय गँगस्टर असल्याचं सेनेगल पोलिसांच्या लक्षात आलं.
सेनेगलमध्ये त्याच्यावर 3 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्याचा तपास संपल्यानंतरच त्याला भारतात आणलं जावू शकते. यासाठी बँगलोर पोलिसांचा तपासात मोठा हातभार लागला आहे.
नेस वाडीयांना धमकी
पंजाब इलेव्हन मॅचच्या दरम्यान नेस वाडियाने स्टेडियमवर प्रीतीची छेड काढली होती. प्रीतीने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. परंतु, तक्रार दाखल होऊन दोन दिवस उलट नाही तेच नेसचे वडील नेसली वाडिया यांनी अंडरवर्ल्डकडून धमकीचा फोन आला. प्रीतीला त्रास देऊ नका आणि नुसली वाडियांनी या प्रकरणात लक्ष देऊ नये, अशी तंबी देण्यात आली होती. हा फोन रवी पुजारी गँगने केला होता असं पोलीस तपासात उघड झालं होतं. मागील वर्षी हे प्रकरण कोर्टात मिटले आहे.
अरिजीत सिंहला धमकी
तसंच बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहला रवी पुजारी गँगकडून धमकी देण्यात आली होती. अरिजीतच्या मॅनेजरला हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतर अरिजीतने ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. रवी पुजारीने 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. हे शक्य नसेल तर पुजारीच्या माणसांसाठी दोन शो मोफत करण्याची अट घातली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours