मुंबई : ‘महागठबंधनमध्ये तुमचा नेता कोण आहे ते तर सांगा. दर दिवशी महागठबंधनचा एक पंतप्रधान असेल. सुट्टी असल्यामुळे रविवारी शरद पवार पंतप्रधान होतील,’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ‘मोदी पंतप्रधान नाही झाले तर मोदींचं नाही तर देशाचं नुकसान होईल. आपल्याला देशाकरता मोदींना पंतप्रधान करावंच लागेल,’ असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ते सीएम चषक या मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.
‘पवार तामिळनाडूत, स्टालिन माणिपूरमध्ये आणि ममता महाराष्ट्रात लोक जमा करू शकत नाहीत. पण मोदी देशात कुठेही गेले तरी लाखो लोक जमा होतात. मोदींच्या माध्यमातून गरिबाला गॅस मिळतोय, वीज मिळत आहे, रोजगाराची संधी तयार होत आहे, 11 कोटी पेक्षा जास्त युवकांना मुद्रा लोण मिळाले आहे,’ असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
-मोदींचे सरकारच सर्वसामान्यांचा विचार करणारे सरकार.
-कालच्या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. गरीब शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळणार.
-गेली पन्नास वर्षे एकही निर्णय विरोधकांना घेता आला नाही.
-ही 2019 ची निवडणूक मोदींना पंतप्रधान करण्यासाठी नाही... ही देशकरता महत्वाची आहे.
-2035 पर्यंत विकासाचा वेग कायम ठेवायचा असेल तर मोदींसारखे नेतृत्व हवे आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours