पुणे, 04 फेब्रुवारी : पुण्याच्या मुंढवा, केशवनगरमधील रेणूका माता मंदिरामागे बिबट्याने 4 ते 5 जणांवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. दिसेल त्या लोकांवर हल्ले केल्यानंतर हा बिबट्या बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या खोल डक्टमध्ये पडल्याचं सांगण्यात येत आहे. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. लोकांच्या आवाजामुळे तो रेणूका माता मंदिरामागे एका काम सुरू असलेल्या इमारतीच्या खोल डक्टमध्ये पडला. आज सकाळी केशवनगर भागात एका बिबट्याने एका ७ वर्षाच्या मुलाला पकडले़ हे पाहून त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी तिघांना या बिबट्याने जखमी केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours