मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला ठोकून काढा म्हणत या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शिवसेनेने सामनामधून केली आहे. पुलवामा हल्ल्यात 37 जवानांना वीरमरण आले. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर जवान आणि शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभा राहण्याची वेळ असल्याचे असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. मोदींनी पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवून पाकिस्तानवरील हल्ल्यांकडे पहावे असेही अग्रलेखात म्हटले आहे.
सामना अग्रलेख
दहशतवादी हल्ल्यात आपल्या 40 जवानांनी बलिदान दिले आहे. कश्मीरची भूमी पुन्हा एकदा हिंदुस्थानी जवानांच्या रक्ताने भिजली आहे. कश्मीर आमचे आहे असे गेल्या सत्तर वर्षांपासून घशाच्या शिरा ताणून सांगितले जात आहे. त्या आमच्या कश्मीरात आमच्याच जवानांच्या हत्या का सुरू आहेत? पंडित नेहरूंपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत परिस्थिती बदलण्याऐवजी बिघडतच चालली आहे व कालच्या ‘पुलवामा’ हल्ल्याने देश हादरला आहे, आक्रोश करीत आहे. हिंदुस्थानी लष्करावर आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या सर्वात मोठय़ा हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नेहमीप्रमाणे हा हल्ला भ्याड असल्याच्या सरकारी आणि राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर आणि सशस्त्र फौजफाटय़ांवर हल्ला करणे व आमचे अतोनात नुकसान करणे यास ‘भ्याड’ हल्ला कसे काय म्हणू शकता? आमच्या अति आणि फाजील आत्मविश्वासावर केलेला हा हल्ला आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. संसदेचे शेवटचे सत्र संपले आहे. संपूर्ण सरकार भाषणबाजीत, आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहे. उद्याच्या निवडणुकांत कसे व कोणत्या मार्गाने जिंकून पुन्हा दिल्लीत यायचे या ‘पत्तेपिसी’त सगळेच दंग आणि गुंग असताना हा भयंकर हल्ला झाला आहे. 350 किलो आरडीएक्स भरलेली कार जवानांच्या ताफ्यात घुसवली व जैश-ए-मोहम्मदने तालिबानी पद्धतीचा आत्मघाती हल्ला केला. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाटांनी काय होणार? देशात अशा लाटा कधी संतापाच्या असतात तर कधी राजकीय विजयोन्मादाच्या असतात. त्या
Post A Comment:
0 comments so far,add yours