मुंबई, 24 फेब्रुवारी : लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आजच्या दिवशी मुंबईला लोकलने फिरण्याचा प्लान करत असाल तर त्याआधी मेगाब्लॉकचं वेळापत्रक नक्की पाहून घ्या.
लोकलमध्ये रविवारी नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जरी कमी असली तरी अनेक लोक सुट्टीची मजा घेण्यासाठी बाहेर पडतात. पण मेगाब्लॉकमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आज हा मनस्ताप वाढण्याची शक्यता आहे. कारण आज लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड डाऊन स्लो मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिट ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेदरम्यान, कोणत्याही लोकल धावणार नाही. त्यासाठी प्रवाशांना रोडने प्रवास करण्याचा मार्ग निवडावा लागणार आहे.
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी डाऊन मार्गावर आणि सीएसएमटी ते वांद्रे अप मार्गावर मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवा बंद राहणार आहे. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरदेखील यावेळीदरम्यान, कोणत्याही लोकल धावणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी या वेळेनुसार आजचा लोकलने फिरण्याचा प्लान करावा.
सिग्नल, रेल्वे रुळांच्या दुरूस्तीसाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज गरज असल्यासच रेल्वेने प्रवास करा असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours